लेख – दुसरा
सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
यावर्षी केंद्र सरकारने आयकर विवरण पत्र (Income Tax Return) भरायचे फॉर्म्स डिसेंबर 2023 आणि फेब्रुवारी 2024 मध्येच जाहीर करून नवीन विक्रम केला आहे. एप्रिल महिन्यापासून आयकराच्या वेबसाईटवर हे फाॅर्म उपलब्ध करूनही दिले आहेत.
आयकर विवरण पत्र ( Income Tax Return) भरणे कोणाला आवश्यक वा सक्तीचे (compulsory) आहे याचे विवेचन आपण या लेखात करूया.
1. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न मूलभूत मर्यादेपेक्षा जास्त (Basic Exemption Limit ) असेल तर
उदा. व्यक्तीचे वय 60 वर्षे पेक्षा कमी असेल तर उत्पन्न मर्यादा रू. 2.50 लाख
60 वर्षे पेक्षा जास्त व 80 वर्षे पेक्षा कमी असेल तर रू. 3.00 लाख
80 वर्षे पेक्षा जास्त असेल तर 5.00 लाख
2. जेव्हा तुमच्या उत्पन्नातून मुळातून कर कपात झालेली असेल तर त्याचा परतावा मिळविण्यासाठी
3. जेव्हा तुम्ही परदेशी गुंतवणूक केली असेल तर किंवा जेव्हा तुम्हाला परदेशी गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळत असेल तर
4. जेव्हा तुम्हाला परदेश प्रवासासाठी ( व्हीसासाठी) अर्ज करायचा असेल तर
5. जर तुम्हाला कर्ज घ्यावयाचे असेल तर मागील किमान तीन वर्षाची
6. जेव्हा करदाता हा फर्म, सोसायटी किंवा कंपनी असेल तेव्हा त्यांना नफा किंवा तोटा झाला असेल तरीही.
7. उद्योग व्यवसायांमध्ये तोटा झाला असेल तर किंवा शेअर मार्केट मधील व्यवहारांपासून, भांडवली उत्पन्नापासून तोटा झाला असेल तर तो पुढे ओढण्यासाठी विहित मुदतीच्या अगोदर आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.
तसेच काही वेळा तुमचे उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा कमी असेल परंतु खालील अटी शर्तींची तुम्ही पूर्तता करीत असाल तरी तुम्हाला आयकर विवरण पत्र भरणे आवश्यक आहे.
8. कोणत्याही बँकेमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त चालू खात्यांमध्ये (current account) वर्षभरात एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम वेळोवेळी भरली असेल तर
9. बँकेच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त बचत खात्यांमध्ये वर्षभरात एकूण 50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम वेळोवेळी भरली असेल तर
10. परदेश प्रवासावरील खर्च हा रुपये दोन लाखपेक्षा जास्त असेल तर
11. तुमच्या नावे असलेल्या सर्व लाईट बिलांची रक्कम वर्षभरात रुपये एक लाख पेक्षा जास्त असेल तर
12. तुमची मुळातून कर कपात TDS / TCS झाली असेल आणि ती रक्कम रुपये 25 हजार पेक्षा जास्त असेल तर किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही TDS / TCS ची रक्कम 50000 पेक्षा जास्त असेल तर
13. तुमच्या उद्योग धंद्याची (Business ) वार्षिक उलाढाल ही रुपये 60 लाख पेक्षा जास्त असेल तर
14. तुमचे वार्षिक व्यवसायापासूनचे उत्पन्न (profession gross receipts) रुपये 10 लाख पेक्षा जास्त असेल तर
वरील तरतुदींचा विचार करता प्रत्येकाने आपले आयकर विवरण पत्र भरणे आवश्यक आहे का हे तपासून पहावे आणि त्यासाठी आपल्या करसल्लागाराशी चर्चा करावी.